उद्धव ठाकरेंनी 'मातोश्री'ची मर्यादा ओलांडू नये- सुषमा स्वराज

गुरूवार, 9 ऑक्टोबर 2014 (16:59 IST)
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'मातोश्री' मर्यादा ओलांडू नये, असा सल्ला केंद्रीय परराष्‍ट्र मंत्री सुषमा स्वराज यांन दिला आहे. उद्धव ठाकरे हे भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर वारंवार टीका करताना दिसत आहेत.

उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या नेत्यांना 'अफजल खान'ची फौज असे संबोधले होते. त्यावर सुषमा यांनी उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. सांगली जिल्ह्यातील प्रचार सभेत सुषमा स्वराज्य बोलत होत्या.

उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्याने आपल्याला खूप दु:ख झाल्याचे सुषमा स्वराज म्हणाल्या. शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपला लक्ष्य केले आहे.

सुषमा म्हणाल्या, राज्यात 15 वर्षांपासून काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार होते. या काळात राज्यात शेतकरी आत्महत्या आणि गुन्हेगारी मोठी वाढ झाल्याचे सांगत सुषमा यांनी आघाडी सरकारवर टीका केली.

वेबदुनिया वर वाचा