अजित पवार यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार

मंगळवार, 23 सप्टेंबर 2014 (11:32 IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात सोमवारी आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल करण्यात आली. बारामती तालुक्यातील सोमेश्वर येथे अजित पवार शेतकरी मेळाव्यासाठी आले होते. यामुळे पवारांविरोधात ही तक्रार दाखल करण्‍यात आली आहे. 
 
तोट्यात गेलेल्या या कारखान्याच्या पेट्रोल पंपावरून त्यांनी राजकीय पक्षांच्या वाहनांना मोफत इंधनाची सोय केली होती. तसेच सायंबाचीवाडी येथील शासकीय ठेकेदाराच्या घरी पवारांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांसवमेत बैठक घेऊन मतदारांसाठी जेवणावळीचा कार्यक्रम घेतला. काही सरकारी अधिकारीही त्यांच्या दिमतीला होते, अशी तक्रार भाजपचे कार्यकर्ते दिलीप खैरे यांनी निवडणूक अधिकार्‍यांकडे केली आहे. 
 

वेबदुनिया वर वाचा