प्रपोझ डे मेसेज Propose Day Messages in Marathi

सोमवार, 7 फेब्रुवारी 2022 (16:07 IST)
शब्दाविना कळावं
मागितल्याशिवाय मिळावं
धाग्याविना जुळावं
स्पर्शावाचून ओळखावं
 
हाती हात देशील का
जन्मभराची साथ देशील का
सांग माझी होशील का?
 
स्पर्श तुझा व्हावा
अन् देह माझा चुरावा
हक्काने मिठीत तू घ्यावेस
जसा पाण्यावरी स्पर्श चांदण्यांचा असावा
 
तुझ्या प्रेमाचा रंग तो..
अजूनही बहरत आहे…
शेवटच्या क्षणापर्यंत
मी फक्ततुझा आहे
 
जे लाखातून एक असतात असं म्हणतात 
अशी लाखातील एक व्यक्ती माझ्यासाठी
फक्त तू आहेस
 
मी तुझ्यावर प्रेम करतो हे कधीच सांगता येत नाही
असंच असतं ग प्रेम जे शब्दात अजिबात मांडता येत नाही
 
तू मला मी तुला ओळखू लागलो
प्रेमात पडूनी एकमेकांच्या बहरु लागलो
 
प्रेम प्रेम प्रेमाची साथ,
आता अजून काय मागू
तुझ्याशिवाय खास 
 
हातात तुझा हात
मला हवी फक्त तुझी साथ
तू हवीस मला कायम होती तुझ्या प्रेमाची आस 
 
तुझ्याशिवाय जगणे खूप कठीण आहे
आणि तुला हे सांगणे खूप कठीण आहे
 
माझ्यापासून सुरु होऊन
तुझ्यातच संपलेला मी
माझे मीपण हरवून
तुझ्यात हरवलेला मी
 
तुझ्या एका हास्यासाठी
चंद्र सुद्धा जागतो
रात्रभर तिष्ठत  बिचारा
आभाळात थांबतो
 
घडलेल्या गोष्टी मागे ठेऊन मला तू स्वीकारशील का?
आता तरी तू माझी./ माझा होशील का?

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती