UP Election 2022 निवडणुकीचा पहिला टप्पा महत्त्वाचा

गुरूवार, 10 फेब्रुवारी 2022 (11:22 IST)
यूपी मध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 11 जिल्ह्यांतील 58 जागांसाठी मतदान होत असून सर्व 58 जागा पश्चिम यूपीत आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत याच पश्चिम यूपीने भाजपला मतदान केले होते तेव्हा 136 जागांवर एकट्या भाजपने 100 पेक्षा जास्त जागा जिंकल्या होत्या, आज ज्या 58 जागांवर निवडणूक होणार आहे, त्यात भाजपने 53 जागा जिंकल्या होत्या.
 
यावेळीही भाजपला पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी या जागा खूप महत्त्वाचा आहेत. भाजपला रोखण्यासाठी पश्चिम यूपीतील सपा राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासमोर आपली कामगिरी सुधारण्याचे आव्हान आहे. 
 
2017 ते 2022 पर्यंत पश्चिम यूपीतील राजकीय समीकरणात बरेच बदलले आहेत. सर्वात मोठे कारण म्हणजे शेतकऱ्यांची भाजपवरील नाराजी. तर दुसरीकडे स्वतःला शेतकऱ्यांचे नेतृत्व म्हणणारे चौधरी कुटुंब यावेळी अखिलेश यांच्यासोबत आहे. 58 जागांपैकी सुमारे 24 जागांवर जाट मतदार निर्णायक भूमिकेत दिसत आहेत.
 
पश्‍चिम यूपीत होणाऱ्या मतदानाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत कारण शेतकरी आंदोलनाचा फटका बसलेल्या भागात मतदान होत आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती