Sukanya Samriddhi Yojana: नववर्षापूर्वी अल्पबचत योजनेच्या व्याजदरात वाढ करून सरकारने गुंतवणूकदारांना भेट दिली आहे. सुकन्या समृद्धी योजनेसाठी, या आर्थिक वर्ष 2023-24 च्या चौथ्या तिमाहीसाठी व्याजदर 8.2 टक्के करण्यात आला आहे. यापूर्वी या योजनेवर गुंतवणूकदारांना 8 टक्के व्याज दिले जात होते. मात्र, सरकारने इतर योजनांच्या व्याजदरात वाढ केलेली नाही.
या आर्थिक वर्षात सरकारने या योजनेसाठी व्याजदरात वाढ करण्याची ही दुसरी वेळ आहे.
यापूर्वी पहिल्या तिमाहीत सरकारने सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर ७.६ टक्क्यांवरून ८ टक्के केला होता.
सुकन्या समृद्धी योजनेसोबतच तीन वर्षांच्या मुदत ठेवींवरील सध्याचा व्याजदर सात टक्क्यांवरून 7.1 टक्के होईल. दुसरीकडे, पीपीएफ आणि बचत ठेवींवरील व्याजदर अनुक्रमे 7.1 टक्के आणि चार टक्के कायम ठेवण्यात आले आहेत.