2000 रुपये 'या' महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात येणार

सोमवार, 12 ऑक्टोबर 2020 (06:29 IST)
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Scheme) या मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना प्रति वर्षाला 6000 रुपये पाठवले जातात. ही रक्कम 3 हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या Farmers खात्यात ट्रान्सफर (Direct benefit Transfer)केली जाते. हे हप्ते एप्रिल, ऑगस्ट आणि डिसेंबरमध्ये पाठवले जातात. आतापर्यंत सरकारडून दोन हप्ते शेतकऱ्यांना पाठवण्यात आले आहेत तर तिसरा हप्ता डिसेंबर 2020 मध्ये पाठवण्यात येणार आहे.
 
पीएम शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत हा लाभ मिळवण्यास तुम्ही पात्र शेतकरी असाल तर याकरता नोंदणी करणे गरजेचे आहे. त्यानंतकच तुमच्या खात्यामध्ये हे 2000 रुपये जमा होतील. या योजनेत रजिस्ट्रेशन करण्याची पद्धत अत्यंत सोपी आहे. यानंतर तुम्हाला घरबसल्या लाभ मिळू शकतो.
 
शेती करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. मात्र त्याकरता काही अटीशर्ती आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या नावावर त्यांची जमीन असली पाहिजे. जर एखादी व्यक्ती शेती करत असेल, पण त्याच्या नावावर शेतजमीन नसेल तर त्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्याचप्रमाणे जर एखादी व्यक्ती शेतकरी आहे पण ती सरकारी कर्मचारी आहे किंवा सरकारी सेवेतून निवृत्त झाला आहे तरी देखील त्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीला मासिक पेन्शन 10 हजार मिळत असेल तरी देखील त्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
 
योजनेसाठी अशी करा तुमच्या नावाची नोंदणी
-https://pmkisan.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर जा आणि त्याठिकाणी असणाऱ्या Farmer Tab वर क्लिक करा
-pmkisan.gov.in या वेबसाईटवर तुम्ही पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का हे देखील तपासू शकता
-Farmer Tab वर क्लिक करून याठिकाणी जाऊन तुम्ही या योजनेत नाव नोंदवण्यासाठी अर्ज करू शकता, त्याचप्रमाणे तुम्ही लाभार्थी असाल तर तुमची स्थिती देखील तपासून पाहू शकता.
-फार्मर टॅबवर new registration वर क्लिक करून नवीन अर्ज करता येईल
-त्यानंतर ओपन झालेल्या पेजवर तुम्हाला आधार नंबर एंटर करावा लागेल.
-याशिवाय शेतकऱ्यांना नाव, जेंडर, श्रेणी,  बँक खाते क्रमांक, IFSC कोड, पत्ता, मोबाइल नंबर, जन्मतिथी इत्यादी माहिती द्यावी लागेल
-त्याचप्रमाणे जमीनाची आवश्यक कागदपत्रे देखील द्यावी लागतील
-सर्व माहिती भरून झाल्यावर सेव्ह पर्यायावर क्लिक करा आणि रजिस्ट्रेशन फॉर्म सबमिट करा
-या फॉर्मची एक प्रिंट तुमच्याकडे ठेवा
 
अशा सुधारा रजिस्ट्रेशनमधील चुका
 
पीएम शेतकरी सन्मान योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर अर्ज करताना झालेल्या चुका सुधारता येतात. वेबसाइटवरील फार्मर कॉर्नरवर जा आणि त्याठिकाणी Edit Aadhaar Details वर क्लिक करा. त्यानंतर तुमचा योग्य आधार नंबर टाकता येईल. जर तुमचे नाव चुकीचे असेल किंवा आधारवरील नावाशी जुळत नसेल तर ही चूक देखील सुधारता येतेय. आणखी मदतीसाठी तुम्ही लेखपाल किंवा कृषी विभागाशी संपर्क करू शकता.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती