युनिव्हर्सल अकाउंट नंबर (यूएएन) भविष्य निर्वाह निधीच्या ठेवी, पैसे काढण्यासाठी आणि इतर सुविधेसाठी वापरण्यात येतो. जर आपल्या पगारातून भविष्य निर्वाह निधी कपत असल्यास आणि आपले पीएफचे शिल्लक पैसे तपासायचे असल्यास आपल्याला UAN नंबर सक्रिय करावे लागणार.
UAN नंबर सक्रिय करण्यासाठीचे काही महत्त्वाचे चरण -
1 सर्वप्रथम www.epfindia.gov.in या संकेत स्थळावर जावे.
2 'Our Services' पर्याय निवडा आणि For Employees वर क्लिक करा.
3 'Member UAN '/Online Services' वर क्लिक करा.
4 'Activate Your UAN ' वर क्लिक करा (उजवीकडे 'Important Links ' च्या अंतर्गत उपलब्ध आहे)
5 आपले तपशील जसे की युएएन, नाव, जन्म तारीख, मोबाईल नंबर आणि कँपचा दाखल करा, आणि 'Get Authorization Pin ' वर क्लिक करा.
आपल्या रजिस्टर्ड केलेल्या मोबाईल नंबर वर एक OTP पाठविण्यात येईल.
6 'I Agree' वर क्लिक करा आणि आलेला OTP नंबर घाला.