सीबीडीटीने सांगितले की ही सुविधा त्या पॅन अर्जदारांना देण्यात येईल, ज्यांच्याकडे वैध आधार क्रमांक आहे आणि त्यांचा मोबाइल नंबर आधार क्रमांकाशी जोडलेला आहे. वाटप करण्याची प्रक्रिया कागदपत्र मुक्त असणार, आणि आवेदकांना इलेक्ट्रानिक पॅन विनामूल्य देण्यात येईल.
पॅनला आधाराशी कसे जोडावे :
पॅन क्रमांक मिळविण्यासाठी अर्जदाराला आयकर विभागाच्या ई - फायलिंग संकेतस्थळावर भेट द्यावी लागणार. त्या संकेतस्थळावर आपले आधार क्रमांकाला प्रविष्ट करावे लागणार. त्यानंतर त्याला आधाराशी जोडलेल्या मोबाईल नंबर वर आलेल्या ओटीपी नंबर प्रविष्ट करावा लागणार.