पुढील महिन्यात या 3 बँकांची चेकबुक निरुपयोगी होतील, त्यांना आधीच बदलून घ्या अन्यथा तुम्ही व्यवहार करू शकणार नाही

सोमवार, 27 सप्टेंबर 2021 (22:55 IST)
ऑक्टोबर महिन्यात तीन बँकांची चेकबुक निरुपयोगी होतील. ही चेकबुक त्या बँकांची आहेत जी दुसऱ्या बँकेत विलीन झाली आहेत. या बँकांनी त्यांच्या ग्राहकांना त्यांचे जुने चेक बुक वेळेत बँकेत जमा करून नवीन घेण्यास सांगितले आहे, अन्यथा नंतर व्यवहारात अडचण येईल. अलाहाबाद बँक, ओरिएंटल बँक आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया अशी या तीन बँकांची नावे आहेत.
 
सर्वप्रथम त्या दोन बँका पंजाब नॅशनल बँकेत विलीन झाल्याबद्दल सांगत आहो. त्यामध्ये ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (OBC) आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया (UBI) यांची नावे आहेत. या दोन बँकांची चेकबुक 1 ऑक्टोबरपासून निरुपयोगी होतील. याबाबत पंजाब नॅशनल बँकेने म्हटले आहे की, नवीन चेकबुक वेळेत घ्या, अन्यथा जुने चेकबुक 1 ऑक्टोबरपासून चालणार नाही. पंजाब नॅशनल बँकेच्या म्हणण्यानुसार, तुम्ही बँकेच्या शाखेत जाऊन जुने चेकबुक जमा करू शकता आणि नवीन मिळवू शकता. किंवा जर मोबाईल अॅप असेल तर तुम्ही त्यावर नवीन चेकबुकसाठी अर्ज करू शकता.
 
काय म्हटले PNBने 
PNBने ट्विटरद्वारे म्हटले आहे की 1 ऑक्टोबर 2021 पासून ई-ओबीसी आणि ई-यूबीआयची जुनी चेकबुक बंद केली जातील. कृपया ओबीसी आणि यूबीआयचे जुने चेकबुक पीएनबीच्या नवीन चेकबुकसह बदलणे गरजेचे आहे. हे चेकबुक अपडेटेड IFSC कोड आणि PNB च्या MIRC सह येईल. 1 एप्रिल 2020 रोजी OBC आणि UBI चे PNB मध्ये विलिनीकरण झाले. तेव्हापासून या बँकांचा IFSC कोड आणि MIRC PNB नुसार चालतील. त्यानुसार चेकबुकची छपाई केली जाईल.
 
PNB नुसार, नवीन चेकबुकसाठी अर्ज करणे खूप सोपे आहे आणि ग्राहक बँक शाखा किंवा बँकेच्या ATM किंवा बँकेच्या PNB One वरून अर्ज करू शकतात. पीएनबीच्या इंटरनेट बँकिंगचा वापर केल्यास ग्राहक नवीन चेकबुकसाठी अर्ज करू शकतात. ग्राहकांना मिळणार्‍या  नवीन चेकबुकवर PNB आणि mIRC चा नवीन IFSC कोड असेल. ओबीसी आणि यूबीआयचा आयएफएससी कोड जुन्या चेकबुकवर लिहिलेला आहे, जो यापुढे वैध राहणार नाही. जर त्या कोडचा चेक बँकेत जमा केला तर तो स्वीकारला जाणार नाही. बँकेने टोल फ्री क्रमांक 18001802222 देखील जारी केला आहे. ग्राहक या नंबरवर कॉल करून चेकबुकबद्दल डिटेल मिळवू शकतात.
 
अलाहाबाद बँक सूचना
दुसरीकडे इंडियन बँक आणि अलाहाबाद बँक यांचे विलिनीकरण झाले आहे. हे पाहता ग्राहकांना आता इंडियन बँकेचे नवीन चेक बुक जारी करावे लागेल. 1 ऑक्टोबरपासून अलाहाबाद बँकेचे जुने चेकबुक वैध राहणार नाही आणि त्यातून कोणताही व्यवहार करता येणार नाही. इंडियन बँकेने ग्राहकांना त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावर नवीन चेक बुक मिळवण्याचे आवाहन केले आहे. अलाहाबाद बँकेने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, ग्राहक नवीन चेक बुक मागवून इंडियन बँकेसोबत सहज बँकिंगचा अनुभव घेऊ शकतात. तथापि, 1 ऑक्टोबर 2021 पेक्षा जुनी चेकबुक स्वीकारली जाणार नाहीत. अलाहाबाद बँकेचे ग्राहक बँकेच्या शाखेला भेट देऊन नवीन चेकबुकसाठी अर्ज करू शकतात किंवा मोबाईल अॅप किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे घरी सहजपणे चेकबुकसाठी अर्ज करू शकतात. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती