आधार कार्ड लॉक करण्यासाठी कार्ड धारकाला १९४७ या क्रमांकावर ‘GETOTP’ असा मेसेज पाठवावा लागेल. त्यानंतर रजिस्टर मोबाईल नंबरवर एक ओटीपी पाठवण्यात येईल. ओटीपी मिळाल्यानंतर कार्ड धारकाने ‘LOCKUID’ असे लिहून एक स्पेस द्यावा. पुढे आधार नंबर आणि मिळालेला ओटीपी लिहून तो मेसेज १९४७ या क्रमांकावर पाठवावा. त्यानंतर आधार नंबर लॉक करण्यात येईल.
आधार नंबर लॉक केल्यानंतर तो काही वेळा नंतर पुन्हा अनलॉक देखील करता येतो. रजिस्टर असलेल्या मोबाईलनंबर वरुन ‘GETOTP’ असे लिहून १९४७ या क्रमांकावर मेसे पाठवा. त्यानंतर मोबाईल नंबर व्हेरिफाय करण्यात येईल. तो व्हेरिफाय झाल्यानंतर पुन्हा ‘UNLOCKID’ असे लिहून पुढे आधार नंबर लिहा. हा मेसेज पुन्हा १९४७ या क्रमांकावर पाठवा. काही वेळातच आधार नंबर पुन्हा अनलॉक होईल.