सोशल मीडियाच्या या प्लॅटफॉर्म द्वारे कमवा, जाणून घ्या ट्रिक

शनिवार, 27 फेब्रुवारी 2021 (15:37 IST)
सोशल मीडियावर अनेक प्लॅटफॉर्म्स आहेत ज्याद्वारे कमावता येऊ शकतं. यात यूट्यूब व फेसबुक सामील आहे पण आता लवकरच ट्विटर देखील कमविण्याची संधी देणार आहे. ट्विटरवर लवकरच नवीन फीचर्स येणार असून त्यापैकी एका फीचरद्वारे कमाई करता येईल. आपल्याला ट्वीटवर पैसे मिळतील. जर आपण ट्विटर यूज करत नसाल तर लगेच अकाउंट बनवा आणि या फीचरचा लाभ उचलण्यासाठी तयार रहा. 
 
या प्रकारे करता येईल कमाई
फॉलोअर्सद्वारे कमाई होणार. होय नवीन फीचरमध्ये विशेष सुविधश असेल. हे फीचर आहे एक्सक्लूसिव्ह कंटेंट चं. हे नवीन फीचर ट्विटर उपयोग करणार्‍यांना स्पेशल कंटेंट अॅक्सेस मिळविण्यासाठी आपल्याला फॉलोअर्सकडून पैशे घेण्याची सुविधा देईल. अर्थात जर आपण एक ट्विटर यूजर आहात आणि आपल्या फॉलोअर्सला विशेष सामुग्री पोहचवू इच्छित आहात तर आपल्याला यासाठी त्यांच्याकडून पैसे आकारता येतील. डीएनएच्या रिपोर्टप्रमाणे मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मने याबद्दलची माहिती एका इंवेस्टर प्रेजेंटेशनमध्ये उघडकीस आणली होती. 
 
'एक्सक्लूसिव्ह कंटेंट' फीचर ट्विटर यूजर्ससाठी कमविण्याचा नवीन मार्ग असेल. ते आपल्या फॉलोअर्सकडून एक्स्ट्रा कंटेंटसाठी चार्ज घेऊ शकतात. यात काही विशेष व्हिडिओ, डील्स, डिस्काउंट आणि न्यूज लेटर सारख्या गोष्टी सामील असू शकतात. या फीचरला सुपर फॉलो नाव देण्यात आले आहे. 'सुपर फॉलो' फीचर या वर्षी ट्विटर यूजर्ससाठी उपलब्ध होणार आहे. 
 
ट्विटरचा उद्देश्य नवीन फीचर आणि प्रॉडक्टसच्या एका सीरीजसह 'सुपर फॉलो' फीचरद्वारे आपला व्यवसाय वाढवणे आहे. ट्विटर आपल्या लहान मेसेजसाठी पसंत केलं जातं, जे मोठ्या प्रमाणात ऑडियंसला ब्रॉडकास्ट केले जातात. पण आता हे प्लेटफॉर्म आणि अधिक विविधता प्रदान करणार आहे. ट्विटर अजून पर्याय तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहे ज्यात लोक कंवर्जेशन करु शकतील.
 
ट्विटरचा उद्देश्य आपली इन्कम 2023 पर्यंद दुप्पट करणे आहे. यासाठी कंपनी नवीन प्लान आणि नवनी फीचरवर काम करत आहे. 2023 पर्यंत ट्विटर क्लबहाउसप्रमाणे लाइव्ह ऑडियो डिस्कशनसाठी एक होस्टिंग प्लेटफॉर्म आणेल. 'ट्विटर स्पेस' चे देखील परीक्षण सुरु आहे, ज्याचा जवळपास एक हजार यूजर्स उपयोग करत आहे. 
 
आपल्या प्लान अंतर्गत ट्विटरने रिव्यूला देखील खरेदी केले आहे. रिव्यू एक न्यूज लेटर पब्लिकेशन सर्व्हिस आहे. ही लोकांना लांब फॉर्ममध्ये कंटेंट शेअर की सुविधा देतं. सोशल मीडियाची दिग्गज कंपनी आपल्या यूजर्सचे स्वारस्य पूर्ण करण्यासाठी 'कम्युनिटीज' हून क्रिएशनची परवानगी देखील देऊ इच्छित आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती