ड्रायव्हिंग शिका पण नियमांकडे दुर्लक्ष करू नका

शनिवार, 5 डिसेंबर 2020 (13:31 IST)
गाडी चालवणे गरज आणि शौक दोन्ही असतं. त्यासाठी सुरुवातीला बरेच लोक ड्रायव्हिंग स्कूल मध्ये प्रवेश घेतात जी चांगली पायरी आहे, तर बरेच लोक याचा सराव घरातील सदस्यांच्या निरीक्षणाखाली करतात किंवा एखाद्या मित्राच्या मदतीने शिकण्याच्या प्रयत्न करतात. 
 
तथापि, बरेच लोक जलदगतीने ड्रायव्हिंग शिकून घेतात, तर बरेच लोक यासाठी वेळ लावतात. काही लोक असे देखील असतात, जी ड्रायव्हिंगचे तंत्र किंवा ड्रायव्हिंग टेक्निक्स पकडत नाही आणि या मुळे आजीवन परिपूर्ण म्हणजे परफेक्ट ड्रायव्हिंग करू शकत नाही. चला जाणून घेऊ या अशे काही पॉईंट्स जे आपल्याला समजून घेणे आवश्यक आहे. 
* गाडी किंवा कारला समजून घेणं आणि त्यावर नियंत्रण ठेवणं - 
गाडी चालवणे म्हणजे निव्वळ स्टियरिंग धरून फिरवणे नसून त्याचे सर्व साधने आणि कार्य समजण्याची गरज असते.

क्लच कधी वापरायचे, अक्सिलेटरचा वापर कधी आणि कसा करायचा आहे, ब्रेक कधी लावायचे आणि इंडिकेटर पासून घेऊन ते इमर्जन्सी  लाइट सारख्या मूलभूत गोष्टींना आपण सैद्धांतिकरीत्या समजून घ्यावं. गाडी न चालवता चांगल्या प्रकारे आपण या गोष्टींना समजले तर आपल्याला गाडी चालवणे सोपे होईल. नंतर मग एखाद्या रिकाम्या जागी गाडी चालवणे आपल्यासाठी फायदेशीर ठरेल आणि हे देखील समजेल की आपलं नियंत्रण गाडीवर कितपत आहे.
  
आपली इच्छा असल्यास ब्रेक वापरा, आपल्याला समजेल तसे क्लच वापरा, गिअर कधी बदलावं आणि इतर फंक्शन कसे वापरावे, ह्याचा उत्तम सराव रिकाम्या जागीच होऊ शकतो. म्हणून रिकाम्या जागी गाडी चालवून त्याच्या वर नियंत्रण मिळवा. गाडी आपल्या नियंत्रणात असावी पण लक्षात ठेवा की रिकाम्या जागी आणि वर्दळीच्या जागी किंवा रहदारीत खूप फरक असत.
 
* रास्ता /ट्रॅफिकचे नियम समजून घेणं आवश्यक आहे-
रस्त्यावरचे सिग्नल काय आहेत, वाहतुकीचे नियम काय आहेत, त्यांचा उल्लंघन केल्यावर काय दंड आकारले जातात, याचे सिद्धांत समजून घेणं आवश्यक आहे. जेव्हा आपण हे सिद्धांत समजून घ्याल तेव्हा एखाद्या ड्रायव्हिंग प्रशिक्षण शाळेत ह्याचा सराव करा.
 
* आत्मविश्वास बाळगा पण अती आत्मविश्वास टाळा -
लक्षात ठेवा की तोच पाण्यात बुडतो, ज्याला पोहणे माहित असते. ज्याला पोहणे येतच नाही तो मुळात पाण्यातच जाणार नाही. म्हणून अति आत्मविश्वास करणे टाळा. अशा प्रकारे जास्त वेगाने गाडी चालवणे टाळा, तसेच वाहतुकीच्या नियमांना पाळले तर आपण अनेक संकटांपासून वाचणार. 
 
या व्यतिरिक्त अशा बऱ्याच गोष्टी आहे ज्यांना लक्षात घेऊन आपण लवकरात लवकर एक अनुभवी व्यक्ती म्हणून गाडी चालवू शकाल. जसे की -
 
* क्लच वर नेहमी पाय ठेवू नका. असं केल्यानं क्लच प्लेट्स खराब होऊ शकते. जर का आपण वेगामध्ये गाडी चालवत असताना क्लच वापरत असाल तर अश्या वेळी अपघात होण्याची शक्यता असते. वेगात असल्यास प्रथम ब्रेक वापरा आणि गिअर बदलतांनाच क्लच वापरा.
 
* कार फिरवताना सावधगिरी बाळगायची असते. एखाद्या वस्तू पासून लांब कार वळवून घ्यावी. एखाद्या मॉल किंवा ऑफिसच्या पार्किंग मध्ये अधिक काळजी घ्यावयाची असते आणि एखाद्या खांबापासून अंतरावर ठेवून कार वळवून घावी.
 
* त्याच प्रमाणे हायवे किंवा महामार्गावर गाडी चालवताना समोरच्या गाडी पासून कमीतकमी 70 मीटर अंतर राखणे आवश्यक आहे. सामान्यतः गाडी चालवताना जर आपल्याला रस्त्याच्या मध्यभागी पांढऱ्या पट्ट्या (ज्या बहुतेक रस्त्यांवर असतात), दिसत असल्यास तर आपण पुढील कार पासून सुरक्षित अंतरावर आहात असे समजू शकता.
 
* रिअर व्यू मिरर आणि विंग मिरर(साइड मिरर) योग्यरीत्या वापरणे आवश्यक आहे. कार मागे करतं असताना देखील मागे वळून बघणे किंवा डोकं बाहेर काढणे टाळावे. आता बऱ्याच कार पार्किंग कॅमेऱ्यासह येत आहेत आणि या मुळे वाहन चालवायला सोपं होत.
 
* लक्षात ठेवा की ड्रायव्हिंग करताना नेहमी कंबर ताठ असावी. अशा प्रकारे बसा की आपण सर्वीकडे सहज आणि आरामात बघू शकता. बऱ्याच लोकांना गाडीमध्ये आरामशीर स्थितीत बसून वाहन चालविण्याची सवय असते, हे हानिकारक असू शकतं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती