बदला दोन हजार रुपयांची नोट, जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया
मंगळवार, 23 मे 2023 (12:16 IST)
दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला असून या नोटांची छपाई बंद केली जाणार असल्याची रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी देण्यात आली. दरम्यान, दोन हजाराच्या नोटा बँकांत जमा करण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा रांगेत उभा रहावे लागेल का ? कोणता फॉर्म भरावा लागेल कोठे बदलून मिळतील नोटा असे अनेक प्रश्न आहेत तर जाणून घेऊ त्यांची उत्तरे ....
नोट बदलण्याची प्रक्रिया 19 मे 2023 पासून सुरू होणार
जर तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन 2000 रुपयांची नोट जमा केली तर त्यावर कोणतेही बंधन नाही, परंतु तुमच्या खात्याचे केवायसी (KYC) असणे आवश्यक आहे. तुम्ही बँकेचे ग्राहक नसाल तरीही तुम्ही नोटा बदलून घेऊ शकता. बाजारात अन्य किमतीच्या नोटांचे पुरेसे प्रमाण आहे तसेच दोन हजार रुपयांच्या नोटांचा दैनंदिन जीवनात फारसा वापर केला जात नाही, यामुळे दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेतल्या जात असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. ठराविक मुदतीपर्यंत दोन हजार रुपयांच्या नोटांचा वापर जनतेला करता येणार आहे. लोकांनी बँकांत दोन हजार रुपयांची नोट जमा केल्यानंतर त्यांना तितक्याच किमतीच्या इतर चलनी नोटा दिल्या जातील. 23 मे पासून 30 सप्टेंबर पर्यंत जनतेला नोटा बदलून घेता येतील. एकावेळी 20 हजार रुपयांपर्यंतच्या नोटा बदलून दिल्या जाणार आहेत. नोट बदलण्याची प्रक्रिया 19 मे 2023 पासून म्हणजेच सुरू होणार आहे.
केंद्र सरकारने 2016 मध्ये पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घातली होती. त्यावेळी अभूतपूर्व चलन तुटवडा निर्माण झाला होता. हा तुटवडा भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने नवीन पाचशे व दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आणण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता त्यातील 2 हजार रुपयाची नोट चलनातून काढून घेतली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. नोव्हेंबर 2016 मध्ये आरबीआय कायद्याच्या कलम 24(1) अंतर्गत दोन हजाराच्या नोटा बाजारात आणल्या गेल्या होत्या.
2 हजार रुपयांच्या नोटा काही वर्षांपूर्वी बंद झालेल्या 500 आणि हजार रुपयांच्या नोटांप्रमाणे बाद झाल्या आहेत का?
उत्तर- दोन हजारांच्या नोटा या चलनातून बाद झालेल्या नाहीत तर त्या वितरणातून बाद झाल्या आहेत. दोन हजारांची नोट ही वैध असणार आहे.
2 हजार रुपयांच्या फक्त 10 नोटा म्हणजे फक्त 20 हजार रुपयेच बदलता येणार का?
उत्तर : RBI ने केलेल्या घोषणेनुसार एका वेळी 2 हजार रुपयांच्या 10 नोटा बदलता येतील. एका वेळी, एका व्यक्तीला 2 हजार रुपयांच्या 10 नोटाच बदलता येणार आहे. समजा एखादा व्यक्ती एकाऐवजी जास्त वेळा बँकेत आला आणि नोटा बदलू लागला तर तसं करण्यास संमती आहे. रांगेत दहावेळा उभं राहून 2 हजारांच्या 100 नोटाही एखादा व्यक्ती बदलू शकतो.
दोन हजारांच्या नोटा बदलण्यासाठी मागच्या वेळी नोटबंदी झाल्यावर जसा फॉर्म भरावा लागला तसा भरावा लागणार?
उत्तर : दोन हजारांच्या नोटा बदलण्यासाठी फॉर्म भरावा लागणार नाही. तसंच ओळखपत्र काढण्याची आवश्यकता नसणार आहे.
नोटा कुठे बदलू शकतो?
तुम्ही बँकेत जाऊन नोट बदलून घेऊ शकता. यासोबतच आरबीआयच्या 16 प्रादेशिक कार्यालयात नोटा बदलून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आरबीआयने म्हटलं की, ज्या भागात बँक नाही किंवा लांबच्या अंतरावर बँक दुर्गम भागात त्या ठिकाणचे लोक रिमोट व्हॅनद्वारेही नोटा बदलू शकतात. अशा परिस्थितीत लोकांना बँकेत जाण्याची गरज नाही.
घरात राहूनही 2 हजाराची नोट बदलता येणार?
नागरिकांना घरी बसूनही दोन हजाराची नोट बदलू घेता येणार आहे. जर बँकेत जाऊन नोटा बदलणे शक्य नसेल, तर तुम्हाला घरी बसून नोटा बदलून घेता येतील. बँकमित्र तुमच्या घरी येऊन नोटा बदलून देतील, असे आरबीआयने म्हटले आहे. या सुविधेद्वारे तुम्हाला 2000 रुपयांच्या दोन नोटा म्हणजे 4000 रुपयांपर्यंतच्या नोटा बदलून दिल्या जातील.
2000 रुपयांची नोट का बंद झाली?
2000 ची नोट आरबीआयने चलनातून बाद केल्यानंतर ही नोट का बंद केली जात आहे, असे प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होत आहेत. या प्रश्नाचे उत्तर आरबीआयने दिले आहे. या नोटा बाजारात कमी वापरल्या गेल्या. त्यांचे चलन बाकीच्या नोटांच्या तुलनेत कमी होते.
2000 रुपयांच्या नोटा बदलायला किंवा जमा करून घ्यायला बँकांनी नकार दिला तर काय करायचे?
सर्वसामान्य जनता 2000 रुपयांच्या बँक नोटांचा त्यांच्या व्यवहारासाठी वापर करू शकते मात्र 30 सप्टेंबर 2023 रोजी किंवा त्यापूर्वी या नोटा बँकेत जमा करण्याचे किंवा त्या बदलून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पण जर 2000 रुपयांच्या नोटा बदलायला किंवा जमा करून घ्यायला बँकांनी नकार दिला तर काय करायचे, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. त्यावर आरबीआयने स्पष्टीकरण दिले आहे. आरबीआयच्या माहितीनुसार, ग्राहकांनी पहिला संबंधित बँकेशी संपर्क साधू शकतात. बँकेने 30 दिवसांच्या कालावधीत प्रतिसाद दिला नाही किंवा बँकेचा प्रतिसाद समाधानकारक नसेल तर भारतीय रिझर्व्ह बँकेकडे एकात्मिक लोकपाल योजना (RB-IOS), आरबीआयच्या तक्रार व्यवस्थापन प्रणाली पोर्टलवर (cms.rbi.org.in) तकार नोंदवता येईल.
दोन हजारांची नोट वैध आहे का? त्याद्वारे व्यवहार केले जाऊ शकतात का?
उत्तर : RBI च्या घोषणेनुसार दोन हजारांच्या नोटा वैध आहेत. त्यामुळे या नोटा द्वारे व्यवहार करता येऊ शकतो.
6) बँक खातं नसेल तरीही 2 हजारांच्या नोटा बदलता येतील का?
उत्तर : होय. बँक खातं नसेल तरीही दोन हजारांच्या नोटा बदलता येणार आहेत. कुठल्या बँकेच्या कुठल्याही शाखेत जाऊन दोन हजार रुपयांच्या नोटा बदलता येणार आहेत.
दोन हजारांच्या नोटा तुमचं खात जिथे असेल तिथेच बदलता येणार का?
उत्तर : दोन हजारांच्या नोटा बदलण्यासाठी तुमचं खातं आहे तिथेच तुम्हाला नोटा बदलता येतील असं नाही. तुम्ही कुठल्याही बँकेतून तुम्ही नोटा बदलू शकता.
ज्येष्ठ नागरिक दोन हजारांच्या 10 पेक्षा जास्त नोटा बदलू शकतात का?
उत्तर : ज्येष्ठ नागरिकही एका वेळी 10 नोटाच बदलू शकतात. ज्येष्ठ नागरिकांना दहाच नोटा बदलता येणार आहेत. वरिष्ठ नागरिकांनाही दहा नोटा कितीहीवेळा बदलता येणार आहेत.
7) दोन हजारांच्या नोटा बदलण्याची मुदत किती आहे?
उत्तर : RBI ने केलेल्या घोषणेनुसार 30 सप्टेंबर 2023 पर्यंत या नोटा बदलून घेता येणार आहेत.