अर्थमंत्री निर्मला सीतारामन सकाळी 11 वाजता संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
पंतप्रधान मोदी संसद भवनात पोहोचले. मंत्रिमंडळाच्या बैठकीत अर्थसंकल्पाला मंजुरी दिली जाईल.
सुरुवातीच्या व्यवहारात, सेन्सेक्स 516.97 अंकांनी वाढून 60,066.87 अंकांवर पोहोचला; निफ्टी 153.15 अंकांच्या वाढीसह 17,815.30 अंकांवर व्यवहार करत होता.
निर्मला सीतारामन राष्ट्रपती भवनाकडे रवाना.
अर्थसंकल्पापूर्वी चांगली बातमी, जानेवारीमध्ये 1.55 लाख कोटींचे GST संकलन, आतापर्यंतचे दुसरे सर्वात मोठे संकलन
गृहकर्जावर दिलासा मिळू शकतो. परदेशी वस्तू महाग होऊ शकतात.
सरकार प्राप्तिकरावरील सूट वाढवू शकते, लोकांना आरोग्य विम्यावरील करातही सूट मिळण्याची अपेक्षा आहे.
महिला, मध्यमवर्ग, शेतकरी, उद्योग अशा प्रत्येक वर्गाला अर्थसंकल्पाकडून अपेक्षा आहेत.