स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच अॅपच्या माध्यमातून बजेट

सोमवार, 25 जानेवारी 2021 (12:39 IST)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदच्या वर्षी आर्थिक बजेट लाल रंगाच्या कपड्यात सादर न होता, तो अॅपच्या माध्यमातून सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय बजेट अॅअप लाँच केले आहे. ज्यामध्ये बजेट संदर्भात सर्व माहिती नागरिकांना मिळणार आहे.
 
युनियन बजेट अॅापद्वारे स्मार्ट फोन यूजर्स हिंदी आणि इंग्लिश या दोन भाषांमध्ये बजेट वाचू शकतात. सामान्य जनतेपर्यंत सर्व माहिती पोहोचू शकेल हाच या मागचा उद्देश आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच अॅपच्यामाध्यमातून बजेट सादर होणार आहे.
 
अॅदप अॅन्ड्रॉइड आणि आओएस या दोन्ही मोबाइलवर उपलब्ध असणार आहे. हे मोबाइल अॅटप आर्थिक माहिती विभाग (डीईए)च्या नेतृत्वात नॅशनल इनर्फॉमेटिक्स सेंटरने (एनआयसी) तयार केले आहे.
 
आर्थिक मंत्रालाच्या म्हणणनुसार अॅ्पला यूजर फ्रेंडली इंटरफेस असेल. यामध्ये 14 वेगळ्या केंद्रीय बजेटच्या कागदपत्रांचा एक्सेस यूजर्सला मिळणार आहे. त्यामध्ये फायनान्शियल स्टेटमेंट, डिमांड फॉर ग्रांट्‌स आणि फायनान्स बिलदेखील असणार आहे. हे सर्व कागदपत्र यूजर्सला डाउनलोडदेखील करता येणार आहे. बजेट 2021 दोन टप्पत सादर होणार आहे. पहिला टप्पा 29 जानेवारी ते 15 फेब्रुवारीर्पंत असेल, तर दुसरा टप्पा 8 मार्च ते 8 एप्रिलपर्यंत चालणार आहे. पहिल्या टप्प्याच्या पहिल्या   दिवशी आर्थिक सर्वेक्षण सभागृहात सादर करण्यात येईल. नव्या वर्षाचे बजेट केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी मांडणार आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती