मास्क घालून फोडणार दहीहंडी

पुण्यात शुक्रवारीही स्वाईन फ्लूचे आणखी 17 पेशंट सापडल्यानंतर आता 14 तारखेला होणाऱ्या दहीहंडीवरही त्याचे सावट पसरले असून, दहीहंडी फोडणाऱ्या मुलांच्या पालकांनी त्यांना मास्क देऊन या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी परवानगी दिली आहे.

पुणे आणि मुंबईमध्ये दहीहंडीची मोठी धूम असते. अशा काळात स्वाईन फ्लू पसरण्याची दाट शक्यता असल्याने अनेक दहीहंडी मंडळही चिंतेत आहेत. काही मंडळांनी तर आपल्या कार्यकर्तांसह दहीहंडी पाहायला आलेल्यांनाही मास्क देण्याची तयारी सुरू केली असून, पुण्यात पाहता-पाहता मास्कची विक्री दुपटीने वाढली आहे.

दहीहंडीला अवघे काही दिवसच शिल्लक असल्याने आणि शाळांमध्ये फ्लूची दहशत असल्याने दहीहंडीचा कार्यक्रम घ्यावा अथवा नाही या संभ्रमात शाळा दिसून येत आहेत.

वेबदुनिया वर वाचा