देशात स्‍वाइन फ्लूचा सहावा बळी

देशात स्वाईन फ्ल्यू या घातक संसर्गजन्य रोगाने थैमान घातले असून रविवारी पुणे येथे एका डॉक्टरचा स्वाइन फ्ल्यूमुळे मृत्यू झाला आहे. तर तामीळनाडूतील चेन्नई येथे एका चार वर्षीय मुलाचा या आजाराने मृत्यू झाल्‍याने देशात आतापर्यंत सहा जणांचा बळी गेला आहे. मृतांमध्‍ये पुण्यातील तीन, अहमदाबाद, चेन्‍नई व मुंबईतील प्रत्येकी एका जणाचा समावेश आहे.

रविवारी पुण्‍यातील ससून हॉ‍स्पिटलमध्ये डॉ. बाबासाहेब माने या आयुर्वेदीक तज्‍ज्ञाचा या आजाराने मृत्यु झाला आहे. याआधी शिक्षक तुकाराम कोकरे (वय 42) यांचा शुक्रवारी मृत्यु झाला होता. तर पहिल्‍यांदा 3 ऑगस्टला 14 वर्षीय विद्यार्थिनी रिदा शेख हीचा स्वाइन फ्ल्यूने बळी घेतला होता.

स्वाइन फ्ल्यूवर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकारची तारेवरील कसरत सुरू आहे. स्वाइन फ्ल्यूसंदर्भात नागरिकांना पडलेले प्रश्न अजून तरी निरुत्तरीतच आहे.

आतापर्यंत देशात 800 पेक्षा जास्त लोकांना स्वाइन फ्लू झाल्‍याचे सिध्‍द झाले असून आतापर्यंत 523 जणांना रुग्णालयातून सूटी देण्‍यात आली आहे.

दिल्लीतून तज्‍ज्ञांची एक टीम पुण्‍याकडे रवाना झाली असून तेथे या आजाराच्‍या रुग्णावर उपचारासाठी जोरदार प्रयत्‍न सुरू आहेत.

पुण्यात आठ शाळा बंद-
स्वाइन फल्यूचा वाढता कहल पाहता पुण्यातील आठ विनाअनुदानित शाळा बंद ठेवण्याचा निर्णय त्या त्या व्यवस्थापनाने घेतला आहे.

वेबदुनिया वर वाचा