रितेश देशमुख

जन्म- 17 डिसेंबर, 1978
पदार्पण- तुझे मेरी कसम

नैसर्गिक अभिनयाची देणगी लाभलेल्या रितेश देशमुख याने आपल्याला विनोदाचा चांगला सेन्स असल्याचे दाखवून दिले आहे. सहज वावर, लक्षवेधी देहबोली, हावभाव, आवाज आणि संवादफेक यातून विनोद उत्पन्न करण्यात तो शंभर टक्के यशस्वी ठरतो.

रितेशला विनोदाचे टायमिंग साधणेही जमते. त्यामुळेच 'मस्ती, 'क्या कूल है हम' , 'मालामाल विकली या चित्रपटांमधून त्याने प्रेक्षक समीक्षकांचे लक्ष वेधून घेतले. वास्तविक वडिल विलासराव देशमुख विद्यमान मुख्यमंत्री. घरात चित्रपटाचे कोणतेही वातावरण नाही.

IFM
अशा परिस्थितीत एका राजकारणी पित्याचा मुलगा आर्किटेक्ट होऊन या क्षेत्रात उतरतो आणि अवघ्या काही चित्रपटांतून आपल्या अस्तित्वाची दखल घ्यायला लावतो. हे निश्चितच कौतुकास्पद आहे. रितेशच्या रूपाने हिंदी चित्रपट इंडस्ट्रीला मराठी हिरो मिळाला आहे.

आर्किटेक्ट झाल्यानंतर न्यू यॉर्कमध्ये नोकरी करत असताना त्याने तेथील प्रख्यात थियटर इन्स्टिट्यूटमध्ये अभिनयाचे धडे गिरवले. ते झाल्यानंतर त्याने अभिनयाचा गांभीर्याने विचार सुरू केला. न्यू यॉर्कहून परत आल्यानंतर रितेशला 'तुझे मेरी कसम' चित्रपटात नायकाची भूमिका मिळाली.

IFM
पहिल्याच चित्रपटातल त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर आलेल्या 'मस्ती'मध्ये त्याने कमालीचा सुंदर अभिनय केला. 'क्या कूल है हम' या विनोदी चित्रपटातही धमाल केली. मालामाल वीकलीमध्ये तर परेश रावल या विनोदातल्या दादा अभिनेत्याबरोबर त्याने काम केले.

सध्या त्याची ओळख त्याच्या विनोदी भूमिकेमुळेच आहे. आपण इतरही भूमिका तितक्याच चांगल्या पद्धतीने करू शकतो, हे सिद्ध करण्यासाठी त्याला वेगवेगळ्या अभिनयछटा असलेले चित्रपट करावे लागतील.

रितेश देशमुख अभिनित चित्रपट-

सामना (आगामी), अपना सपना मनी मनी, मालामाल विकली, फाईट क्लब, डरना जरूरी है, नाच, बडदास्त, क्या कूल है हम, ब्लफमास्टर, मस्ती, आऊट ऑफ कंट्रोल, तुझे मेरी कसम

पुरस्कार-
उत्कृष्ट हास्य अभिनेता, चित्रपट- मस्ती (स्टार स्क्रीन पुरस्कार, झी सिने पुरस्कार)
उत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, चित्रपट- क्या कूल है हम ( स्टारडस्ट पुरस्कार)
उत्कृष्ट हास्य अभिनेता, चित्रपट- ब्लफमास्टर (झी सिने पुरस्कार)

वेबदुनिया वर वाचा