गानकोकीळा लता मंगेशकर

IFMIFM
28 सप्टेंबर 1919 साली इंदुर येथे जन्मलेल्या लता दीदी आज एकोणऐंशीव्या वर्षात पदार्पण करत आहेत. लता दीदी ह्याएक जिवंत दंतकथा आहेत. ईश्वराच्या कृपेने त्यांना जो आवाज मिळाला त्या आवाजाचा उपयोग त्यांनी मानव कल्याणासाठी केला.

जगात अशी कोणतीच स्त्री नाही की जिने आपल्या सुमधुर आवाजाच्या जोरावर एवढी धनसंपत्ती आणि आपले नाव कमवून मानसम्मान मिळवला. आपल्या गोड आवाजाने लहान मुलांपासून ते प्रौढांना वेळोवेळी त्यांनी आनंद दिला. त्यांच्या लोरीने लहान मुलांना झोपी घातले. त्यांच्या गाण्यातुन युवकांनी प्रेम अभिव्यक्त करण्याची प्रेरणा घेतली.

वयस्कर लोकांना आपल्या आवाजाचा आधार त्यांनी दिला. संपूर्ण मंगेशकर कुटूंबाने आपले कठोर परिश्रम आणि साधनेच्या जिवावर जगातील संगीत श्रोत्यांना आदर्शाबरोबर प्रेरणेचा स्त्रोत दिला. म्हणूनच पृथ्वीवर चंद्र सूर्याचे अस्तित्व असेपर्यंत लता दीदीचा आवाज आसमांत गुंजत राहील. तर मग चला तर आपणास लता दीदीच्या जीवनाविषयी थोडेफार जाणून घेण्याची संधी या लेखाद्वारे देत आहोत.

लता दीदीचे गाणे पूजा करण्यासारखे असते. त्या गाण्याची रेकॉर्डींगसुद्धा अनवाणीच करतात. त्यांच्या वडीलांनी भेट म्हणून दिलेला तंबोरा त्यांनी अजूनही जपून ठेवला आहे. दीदीला छायाचित्रणाचाही छंद आहे. विदेशात त्यांनी केलेल्या छायाचित्रणाचे प्रदर्शनही आयोजित केले होते. खेळांमध्ये त्यांना सर्वात जास्त क्रिकेटचा खेळ आवडतो.

जर भारताचा एखाद्या बलाढ्य संघाशी क्रिकेट सामना असेल तर त्या दिवशी सर्व कामे सोडून त्या सामना पाहतात. कागदावर काहीही लिहिण्यापूर्वी त्या'श्रीकृष्णा' चे नाव लिहूनच लिहण्यास सुरवात करतात. हे थोडेसे आश्चर्यकारक वाटते पण ते खरे आहे. 'आएगा आनेवाला' या गाण्याच्या रेकॉर्डींगसाठी त्यांना बावीस वेळा रिटेक द्यावा लागला होता.

दीदीला जेवणात कोल्हापुरी मटन आणि मच्छी फ्राय खूप आवडते. निओ स्टॉलस्टॉय, खलील जिब्रान या लेखकांचे साहित्य त्यांना खूप आवडते. त्याचबरोबर ज्ञानेश्वरी आणि गीतादेखील त्यांना आवडते.

कुंदनलाल सहगल आणि नूरजहाँ लता दीदीचे सर्वात जास्त आवडते गायक-गायिका आहेत. शास्त्रीय गायकांमध्ये पंडीत रविशंकर, जसराज, भीमसेन जोशी, गुलाम अली आणि अली अकबर खान हे आवडतात. गुरूदत्त, सत्यजीत रे, यश चोप्रा, आणि विमल रॉय यांचे चित्रपट त्यांना खूप आवडतात. रोज झोपण्यापूर्वी त्या देवाचे नामस्मरण करतात. दीपावली त्यांचा सर्वात जास्त आवडता सण आहे.

1984 मध्ये लंडन रॉयल अलबर्ट हॉल आणि व्हिक्टोरीया हॉलमध्ये गाणे गाताना त्यांना खूप आनंद झाला होता. कारण गाणे ऐकण्यासाठी जमलेल्या पाच हजार लोकांनी सलग दहा मिनिटे टाळ्या वाजविल्या होत्या. हा क्षण त्यांच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा आणि आठवणीतील आहे.

भारतीय इतिहास आणि संस्कृतीतील कृष्ण, मीरा, विवेकानंद आणि अरविंदो त्यांना खूप आवडतात. पडोसन, वुईथ द विंड आणि टायटेनिक हे चित्रपट त्यांच्या आवडीचे आहेत. दुसर्‍यावर लगेच विश्वास ठेवणे या सवयीला त्या आपली कमजोरी समजतात. पहिल्यांदा स्टेजवर गाणे गायिले होते तेव्हा त्यांना पंचवीस रूपये मिळाले होते. ती त्यांची पहिली कमाई होती. पडद्यावर अभिनेत्रीच्या रूपात त्यांना पहिल्यांदा तीनशे रूपये मिळाले होते.

उस्ताद अमान खाँ भेंडी बाजार वाले आणि पंडीत नरेंद्र शर्मा यांना दीदी आपले संगीत गुरू मानतात. श्रीकृष्ण शर्मा त्यांचे आध्यात्मिक गुरू होते. महाशिवरात्र, श्रावण सोमवाराशिवाय त्या गुरूवारीही व्रत ठेवतात. लता दीदीने आपले पहिले फिल्मी गीत 1942 मध्ये 'किती हसाल' या मराठी चित्रपटासाठी गायिले होते. परंतु काही कारणास्तव या गाण्याला चित्रपटात सामील केले नव्हते.

त्यानंतर 1942 मध्ये 'पहिली मंगळागौर' या मराठी चित्रपटात त्यांचा आवाज प्रथमच ऐकायला मिळाला. 1947 मध्ये 'आपकी सेवा' या हिंदी चित्रपटात दीदीने पहिल्यांदा गाणे गायिले. 'पा लागू कर जोरी रे' हे त्या गाण्याचे बोल होते. लता दीदीने पहिल्यांदा नायिका मुन्नवर सुलतानासाठी पार्श्वगायन केले.

लता दीदीने इंग्रजी, आसामी, बांग्लादेशी, ब्रजभाषा, डोगरी, भोजपुरी, कोंकणी, कन्नड़, मगधी, मैथिली, मणिपुरी, मल्याळम, सिंधी, तामिळ, तेलगु, उर्दू, मराठी, नेपाळी, उडीया, पंजाबी, संस्कृत, सिंहली आदी भाषांमध्ये गाणे गायले आहेत. दीदी मराठी भाषिक आहेत परंतु त्या हिंदी, बांग्लादेशी, तामिळ, संस्कृत, गुजराती आणि पंजाबी भाषेतही गातात.अभिनेत्रीच्या रूपात त्यांनी अनेक मराठी व हिंदी चित्रपटात काम केले आहे. हिंदीतील बडी माँ, जीवन यात्रा, सुभद्रा, छत्रपती शिवाजी या चित्रपटात काम केले आहे.

गायिका-अभिनेत्रीबरोबर दीदीने चित्रपटाला संगीत देण्याचे कामही केले. अधिकतर मराठी चित्रपटात त्यांनी आनंदघन नावाने संगीत दिले आहे. चित्रपट निर्माता म्हणूनही काम केले. त्यांनी 'लेकीन', 'बादल', आणि 'कांचनगंगा' या चित्रपटाची निर्मिती केली.

आजा रे परदेशी (मधुमती: 1958), कही दीप जले कही दिल (बीस साल बाद: 1962), तुम ही मेरे मंदिर (खानदान: 1965) आणि आप मुझे अच्छे लगने लगे (जीने की राह: 1969) या गाण्यासाठी त्यांना फिल्मफेयर पुरस्कार मिळाले. त्यानंतर त्यांनी हा पुरस्कार स्वीकारणे बंद केले कारण हा पुरस्कार नवीन गायिकांना मिळावा असे त्यांना वाटत होते.

परिचय (1972), कोरा कागज (1974) आणि लेकीन (1990) साठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. 1951 साली लता दीदीने सर्वाधिक 225 गाणे गायले होते.

पुरुष गायकांपैकी मोहम्मद रफीबरोबर त्यांनी सर्वाधिक 440 युगल गीत, किशोर कुमारबरोबर 327 गीत गायन केले. महिला युगल गीते त्यांनी सर्वात जास्त आशा भोसलेबरोबर गायिले.

लक्ष्मीकांत प्यारेलाल 686, शंकर-जयकिशन 453, आर. डी. बर्मन 343 आणि कल्याणजी-आनंदजी यासाठी लता दीदीने 303 गाणे गायिले.

गीतकारांमध्ये आनंद बक्षीद्वारा लिहलेले 700 पेक्षाही अधिक गीत त्यांनी गायिले.








वेबदुनिया वर वाचा