'बर्थ डे बॉय' हृतिक रोशन

वेबदुनिया

गुरूवार, 10 जानेवारी 2008 (18:03 IST)
IFMIFM
बॉलिवूडचा सुपरस्टार ह्रतिक रोशन आज 34 वर्षांचा झाला. कोणताही गाजावाजा न करता तो आपला वाढदिवस साजरा करणार आहे. त्यांच्या घरी आज त्याच्यासहित त्याचे कुटुंबीय धार्मिक कार्य करणार आहे. संध्याकाळी तो पत्नी व मुलासोबत डिनर घेण्यासाठी जाईल.

चांगला अभिनेता व चांगल्या स्वभावाचा अशी ह्रतिकची बॉलीवूडमध्ये ख्याती आहे. यामुळेच त्याचे चाहते त्याच्यावर भरभरून प्रेम करतात.

हृतिक गेल्या काही दिवसांपासून गुडघेदुखीने त्रस्त झाला आहे. 15 जानेवारीला प्रदर्शित होत असलेल्या 'जोधा अकबर'वर त्याचे लक्ष केंद्रीत आहे. या चित्रपटाच्या प्रसिद्धीतही तो सहभागी होणार आहे. मागील वर्षी त्याचा एकही चित्रपट प्रदर्शित झाला नाही. या वर्षीही जोधा अकबर हा एकमेव चित्रपट येणार आहे. हृतिकला बर्‍याच चित्रपटांच्या ऑफर्स येतात पण चोखंदळ असणार्‍या ह्रतिकचा बराचसा वेळ पटकथा वाचण्यातच बराच वेळ निघून जातो. ज्या चि‍त्रपटाची पटकथा त्याला आवडते तोच ‍चित्रपट तो स्वीकारतो.

मागील आठ वर्षात त्याने जवळपास 15 चित्रपटात भूमिका केल्या आहेत. 'कहो ना प्यार है' लोकप्रिय झाल्यानंतर काही चुकीचे चित्रपट त्याने स्वीकारले. पण नंतर सावध होऊन त्याने चांगलेच चित्रपट निवडण्याचे ठरविले. त्याच्या म्हणण्यानुसार जर त्याला कथा आवडली नाही तर प्रेक्षकांना कशी आवडेल? अशा या सुपरहिरोकडून प्रेक्षकांना फारच अपेक्षा आहेत.

'जोधा अकबर' बद्दल बोलतांना तो म्हणतो, हा छान चित्रपट असून यावर सगळ्यांनीच फार मेहनत घेतली आहे. त्याला श्याम बेनेगल यांचा चित्रपटात गौतम बुध्दांची भूमिका मिळाली आहे. पण त्याने याबाबतीत काहीही सांगण्यास नकार दिला. या व्यतिरिक्त राकेश रोशन त्याच्यासाठी एका चित्रपटाची पटकथा लिहीत आहे. अनुराग बसूदेखिल त्याच्या सोबत एक चित्रपट सुरू करीत आहे.

वेबदुनिया वर वाचा