कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विम्बल्डनही लांबणीवर?
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे क्रीडा क्षेत्रातील सर्व सामने रद्द झाले असताना आता महत्त्वाची विम्बल्डन स्पर्धाही लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
जून-जुलै महिन्यात विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेचे आयोजन केले जाते. यावेळी ही स्पर्धा लांबणीवर टाकायची की रद्द करायची, याचा निर्णय घेण्यासाठी ऑल इंग्लंड क्लबने पुढील आठवड्यात तातडीची बैठक बोलावली आहे.
1877 पासून सुरू झालेली विम्बल्डन स्पर्धा फक्त दोन महायुद्धामुंळे थांबवण्यात आली होती. करोनामुळे जागतिक क्रीडा वेळापत्रक बिघडले असताना मे महिन्यात लालमातीवर होणारी फ्रेंच खुली स्पर्धा आता 20
सप्टेंबरपासून खेळवण्यात येणार आहे. मात्र, नैसर्गिक हिरवळीवर खेळवण्यात येणार्या स्पर्धाचा मोसम हा फक्त पाच आठवडे असतो. त्यामुळे विम्बल्डन स्पर्धा कधी घ्यायची किंवा रद्द करायची, याचा निर्णय आता संयोजकांना घ्यावा लागणार आहे.