वास्तविक, सुमितने काहीच कालावधीपूर्वी स्पेनविरूद्ध डेव्हिस चषक पदार्पणात प्रभावी कामगिरी साकारली होती. पण न्यूझीलंडविरूद्ध आगामी मालिकेसाठी त्याला वगळले गेले आहे. गतवर्षी जुलैमध्ये कोरियाविरूद्ध चंदिगढमध्ये मालिका सुरू असताना सुमितने सकाळच्या सराव सत्रात सहभाग घेतला नव्हता. त्यावरून त्याच्यावर ही कारवाई केली गेली.