सानियाचे विजयासह जोरदार पुनरागमन

बुधवार, 3 मार्च 2021 (15:47 IST)
भारताची स्टार टेनिस खेळाडू सानिया मिर्झाने डब्ल्यूटीए सर्किटमध्ये विजयासह जोरदार पुनरागमन केले आहे. सानियाने स्लोव्हेनियाची आपली जोडीदार आंद्रेजा क्लेपॅकसोबत मिळून नादिया किचेनोक व ल्यूडमाइला किचेनोक या युक्रेनच्या जोडीला पराभूत करत कतार टोटल ओपन टेनिस टुर्नामेंटच्या महिला दुहेरी उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
 
सानियाचा बारा महिन्यातील हा पहिला सामना होता. ती मागील वर्षी फेब्रुवारी 2020 मध्ये दोहा ओपनमध्ये खेळली होती. ज्यानंतर कोरोना महामारीने जगभरातील टेनिस टुर्नामेंट स्थगित कराव्या लागल्या होत्या. सानिया स्वतःही जानेवारीत कोरोनातून सावरली आहे. सानिया व आंद्रेजाने आपल्या पहिल्या सेटमध्ये सर्व्हिस गमावली. ज्यामुळे ही जोडी पिछाडीवर पडली. चौथ्या गेममध्ये ही जोडी आपली सर्व्हिस गमावण्याच्या मार्गावर होती. मात्र स्कोर 1-3 करण्यात त्यांना यश आले. या जोडीने सातव्या गेममध्ये किचेनोक बघिणींची सर्व्हिस भेदत पुनरागमन केले व स्कोर 4-4 असा केला. नवव्या गेममध्ये युक्रेनच्या जोडीची सर्व्हिस तोडण्यात व पुन्हा आपल्या सर्व्हिसचा बचाव करण्याबरोबरच सानिया व आंद्रेजाने पहिला सेट जिंकला. युक्रेनच्या जोडीने दुसर्या सेटमध्ये सानिया व आंद्रेजा यांची सर्व्हिस भेदत 3-1 अशी आघाडी घेतली. भारत व स्लोव्हेनियाच्या जोडीने सेटला ट्रायब्रेकरपर्यंत खेचले मात्र हार मानली नाही. सुपर ट्रायब्रेकरमध्ये सानिया व आंद्रेजा जोडीचा दबदबा राहिला. या नंतर या जोडीने 5-1 ने आघाडी घेत सामना जिंकला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती