मनु भाकरच्या नेतृत्वाखाली भारताने रविवारी आयएसएसएफ ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पदकतालिकेत अव्वल स्थान पटकावले आणि सहापैकी चार सुवर्णपदके मिळवली. भारताने 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत क्लीन स्वीप केले. यामध्ये मिश्र, महिला आणि पुरुष सांघिक अजिंक्यपदांचा समावेश आहे. याशिवाय पुरुषांच्या 10 मीटर रायफल सांघिक स्पर्धेतही भारताने सुवर्णपदक जिंकले. भारताच्या नावावर आता सहा सुवर्ण, सहा रौप्य आणि दोन कांस्य पदके आहेत. चार सुवर्ण, चार रौप्य आणि दोन कांस्यपदकांसह अमेरिका दुसऱ्या स्थानावर आहे.