सौरम चौधरीला 10 मीटर एअर पिस्टलमध्ये स्वर्ण पदक आणि ओलंपिक कोटा

सोमवार, 25 फेब्रुवारी 2019 (18:13 IST)
सोळा वर्षाचा शूटर सौरभ चौधरीने रविवारी आयएसएसएफ वर्ल्ड कपमध्ये विश्व रेकॉर्ड तोडून स्वर्ण पदक प्राप्त केलं आणि देशासाठी टोकियो ओलंपिकचा तिसरा कोटा निश्चित केला. सौरभने इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट्स फेडरेशनच्या सत्राच्या सुरुवाती स्पर्धेत पुरुषांची शीर्ष 10 मीटर एअर पिस्टल स्पर्धेत अव्वल स्थान मिळविला. आशियाई गेम्स स्वर्ण विजेतेने एकूण 245 गुण मिळविले. सर्बियाचे दामी मिकेच 239.3 गुणांसह दुसर्या स्थानावर तर 215.2 गुणांसह चीनच्या वेई पांगने तिसरा स्थान पटकावला. 
 
आठ पुरुषांच्या फाइनलमध्ये सौरभने छाप पाडली आणि रजत पदक विजेतेपेक्षा 5.7 गुणाने पुढे राहिले. अशा प्रकारे त्याने अंतिम शॉट संपण्यापूर्वीच स्वर्ण पदक निश्चित केले होते. चांगली सुरूवात असूनही सौरभ पहिल्या सीरीझनंतर सर्बियन शूटरच्या बरोबरीने होते. दुसऱ्या सीरीझमध्ये सुद्धा या चॅम्पियन शूटरने चांगला फॉर्म चालू ठेवला आणि प्रथम स्थान मिळविला. या स्पर्धेत भाग घेणारे इतर भारतीय अभिषेक वर्मा आणि रवींद्र सिंग फाइनलसाठी पात्र ठरले नाहीत. क्वालीफिकेशन फेरीत दोन्ही खेळाडूंनी 576 गुण मिळविले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती