महिलांनी झेप घेण्याची गरज – सानिया

शुक्रवार, 28 जुलै 2017 (13:26 IST)
भारतातील महिला टेनिसला अधिक उंच झेप घेण्याची गरज निर्माण झाली असल्याचे प्रतिपादन अव्वल महिला टेनिसपटू सानिया मिर्झाने केले आहे. कर्मन कौर आणि प्रार्थना ठोंबरे या सारख्या नवोदित महिला टेनिसपटूंची सध्याची कामगिरी समाधानकारक असली तरी त्यांच्याकडून नजिकच्या काळात अधिक सुधारणा घडणे जरूरीचे आहे, असेही सानिया म्हणाली. भारतातील नवोदित महिला टेनिसपटू ठोंबरे, कौर आणि अंकिता भांब्री यांना आंतरराष्ट्रीय महिला टेनिसपटूंच्या मानांकन यादीत आपल्या स्थानाची सुधारणा करून घेण्यासाठी अधिक सराव करावा लागेल. महिला टेनिस क्षेत्रामध्ये भारताला यापुढे मोठी झेप घेण्याची गरज असून या नवोदित टेनिसपटूंकडून ही कामगिरी शक्य होईल, अशी आशा सानिया मिर्झाने व्यक्त केली आहे. 

वेबदुनिया वर वाचा