एलिनाला रोम मास्टर्सचे ताज

युक्रेनच्या एलिना स्विटोलिनाने रोम मास्टर्स टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद पटाकवले. अंतिम लढतीत एलिनाने रोमानियाच्या सिनोमा हॅलेपला 4-6, 7-5, 6-1 असे पराभूत केले. या दोंघीमधील झालेली लढत चांगलीच चुरशीची झाली. 
 
एलिनाचे हे मोसमातील चौथे विजेतेपद ठरले आहे. या मोसमात एलिनाने तैवान ओपन, दुबई चॅम्पियनशिप, इस्तंबुल कप आणि आता रोम स्पर्धा जिंकली. जागतिक क्रमवारीत सिमोना चौथ्या, तर एलिना 11 व्या क्रमांकावर आहे.

वेबदुनिया वर वाचा