टोक्यो ऑलिम्पिकमध्ये राणी रामपाल करणार टीम इंडियाचे नेतृत्व

मंगळवार, 22 जून 2021 (14:38 IST)
पुढील महिन्यात होणार्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये राणी रामपाल भारतीय महिला हॉकी संघाचे नेतृत्व करणार आहे. हॉकी इंडियाने सोमवारी ही नियुक्ती केली. ऑलिम्पिकसाठी काही दिवसांपूर्वी हॉकी इंडियाने 16 सदस्यीय भारतीय महिला हॉकी संघाची घोषणा केली होती. मात्र, त्यावेळी कर्णधार कोण असेल, याची घोषणा करण्यात आली नव्हती.
 
संघाची बचावपटू दीप ग्रेस एक्का आणि गोलरक्षक सविता पुनिया यांना उपकर्णधार म्हणून नेमण्यात आले आहे. राणी म्हणाली, ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करणे हा सन्मान  आहे. वर्षानुवर्षे कर्णधार म्हणून माझी भूमिका सुलभ झाली आहे. मी या जबाबदारीसाठी तयार आहे आणि हॉकी इंडियाने मला हा सन्मान दिला त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. राणीच्या  नेतृत्वात भारतीय संघाने 2018मध्ये लंडन येथे झालेल्या एफआयएच महिला विश्वचषकाची प्रथमच उपान्त्यपूर्व फेरी गाठली होती. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती