गुकेश आणि त्याच्या पालकांनी अलीकडेच चेन्नईमध्ये सुपरस्टार रजनीकांत यांची भेट घेतली. गुकेशने त्याच्या एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तो रजनीकांतसोबत उभा आहे. त्याने लिहिले, "सुपरस्टार रजनीकांत सर, तुमच्या शुभेच्छा आणि वेळेबद्दल धन्यवाद. तुमच्यासोबत घालवलेला वेळ आणि तुमचा सल्ला आमच्यासाठी खूप मौल्यवान आहे."
त्याच्या विजयानंतर गुकेशला अमिताभ बच्चन, मोहनलाल, महेश बाबू यांसारख्या बॉलिवूडमधील अनेक बड्या स्टार्सकडून शुभेच्छा मिळाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांचे अभिनंदन केले आहे. गुकेशने 12 डिसेंबर 2024 रोजी सिंगापूर येथे झालेल्या रोमहर्षक फायनलमध्ये चीनच्या डिंग लिरेनचा पराभव करून सर्वात तरुण बुद्धिबळ विश्वविजेता होण्याचा मान मिळवला आहे.