Denmark Open: पीव्ही सिंधूचा डेन्मार्क ओपनच्या उपांत्य फेरीत मारिनकडून पराभव

Webdunia
रविवार, 22 ऑक्टोबर 2023 (11:00 IST)
भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूचा डेन्मार्क ओपन सुपर 750 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभव झाला. सिंधूला स्पेनच्या कॅरोलिना मारिनने तीन गेममध्ये पराभूत केले. एक तास 13 मिनिटे चाललेल्या या सामन्यात भारतीय खेळाडूला 18-21, 21-19, 7-21 ने पराभवाला सामोरे जावे लागले. सिंधूचा मारिनविरुद्धचा हा सलग पाचवा पराभव आहे.
 
मरिनने 2016 च्या रिओ ऑलिम्पिक आणि 2018 वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही सिंधूचा पराभव केला होता. सिंधूचे जागतिक क्रमवारीत 12वे तर मरिन सध्या सहाव्या स्थानावर आहे. निर्णायक गेममध्ये, पंचांनी दोन्ही खेळाडूंना पॉईंट जिंकल्यावर आक्रमक सेलिब्रेशनचा इशारा दिला आणि पिवळे कार्डही दाखवले.
 




Edited by - Priya Dixit   
 
 

संबंधित माहिती

पुढील लेख