भारताचा ग्रँडमास्टर आर प्रग्नानंदने देशबांधव पी हरिकृष्णाचा पराभव केला तर अर्जुन एरिगेसीला टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात अनिर्णित समाधान मानावे लागले. तत्पूर्वी, नुकताच खेलरत्न प्रदान करण्यात आलेला विश्वविजेता गुकेश याने रशियन वंशाच्या व्लादिमीर फेडोसेव्हसोबत ड्रॉ खेळला, तर लिओन ल्यूक मेंडोसाला उझबेकिस्तानच्या नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्हने पराभूत केले.
19 वर्षीय प्रज्ञानंदने बचाव आणि काउंटर हल्ल्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत हरिकृष्णाचा पराभव केला. तर हरिकृष्णला काही भागांत चांगली कामगिरी करूनही लय राखता आली नाही. एरिगेसी पहिल्या फेरीत गुकेशला पराभूत करण्याच्या जवळ आला आणि त्याने स्थानिक खेळाडू अनिश गिरी याच्यासोबत ड्रॉ खेळला. फॅबियानो कारुआनाने नेदरलँडच्या जॉर्डन व्हॅन फॉरेस्टचा पराभव केला.