बेंगळूरू: आगामी प्रीमियर बॅडमिंटन लीगमध्ये वापरण्यात येणारी गुण पद्धत हा खूप वेगळा प्रयोग असून त्यामुळे सामन्यांच्या निकालातील अनिश्चितता वाढेल आणि आधिकारिक प्रेक्षक या खेळाकडे आकर्षित होतील, असे मत भारताचे माजी ऑल इंग्लंड बॅडमिंटन विजेते प्रकाश पदुकोण यांनी व्यक्त केले.
सायनाने मध्यंतरी म्हटले होते की, ही नवी गुणदान पद्धत कशी काम करते हे पाहणे औत्सुक्तयाचे ठरेल पण कमी गुण असल्यामुळे सामने झटपट संपतील. ऑलिंपिक रौप्यविजेत्या सिंधूने यासंदर्भात वक्तव्य केले होते की कमी गुण असल्यामुळे प्रत्येक गेमच्या अगदी प्रारंभापासूनच खेळाडूला सावध राहावे लागेल.
खेळाच्या प्रेक्षकांची संख्या वाढविण्यासाठी गुणदान पद्धतीत नवे बदल करण्याचा प्रयत्न काहीवेळा उपयुक्त ठरतो. पण जोपर्यंत तो खेळावर विपरित परिणाम करत नाही, तोपर्यंत असा बदल वापरात असण्यात गैर काही नाही, मात्र जागतिक बॅडमिंटन फेडरेशन हा नियम आंतरराष्ट्रीय स्तरावर वापरण्यास तूर्तास इच्छुक नाही, असे दिसते. तरीही त्यांनी प्रयोग करून पाहायला हरकत नाही.