नेयमारची बार्सिलोनामधून विदाई

शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017 (13:01 IST)
लिओनेल मेस्सी, लुईस सुआरेझ आणि  नेयमार या बार्सिलोना क्लबच्या प्रमुख आक्रमणपटूंची फळी दुभंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ब्राझिलच्या नेयमारने बार्सिलोना क्लबला सोडचिठ्ठी देणार असल्याचा निर्णय सहकार्‍यांना सांगितला.

क्लबनेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यामुळे नेयमार पॅरिस सेंट जर्मेन क्लबमध्ये जाण्याच्या शक्यतेला बळकटी मिळाली आहे. नियोजित वेळापत्रकानुसार नेयमार क्लबच्या सराव शिबिराला उपस्थित राहिला आणि त्यावेळी त्याने सहकार्‍यांना आपण क्लब सोडत असल्याचे सांगितले, अशी माहिती सूत्रांनी दिली.  

वेबदुनिया वर वाचा