नीरज चोप्राने शुक्रवारी दोहा डायमंड लीग 2024 मध्ये दुसरे स्थान मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावर शानदार पुनरागमन केले. दोहा येथे 2023 च्या मोसमात सुवर्णपदक जिंकणारा नीरज त्याच्या पहिल्या दोन प्रयत्नांमध्ये 85 मीटरचा टप्पा गाठण्यात अयशस्वी ठरला, परंतु अंतिम फेरीत 88.36 मीटर फेकून दुसऱ्या स्थानावर राहिला.
2022 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्याने चौथ्या प्रयत्नात 86.18 मीटर आणि पाचव्या प्रयत्नात 82.28 मीटर फेकची नोंद केली. जेकबने त्याच्या शेवटच्या दोन प्रयत्नांमध्ये फाऊल केल्याने नीरज आणि अँडरसनला अव्वल स्थान मिळवण्याची मोठी संधी मिळाली.हाव्या प्रयत्नात दोन्ही खेळाडूंना त्यांच्या मागील सर्वोत्तम कामगिरीला मागे टाकण्यात अपयश आले. अँडरसनने त्याच्या अंतिम प्रयत्नात 86.62 मीटर फेक नोंदवला.
नीरजचा चौथा प्रयत्न 86.18 मीटर होता आणि त्याने दुसरे स्थान कायम राखले. तर, वडलेचने 84.04 मीटर आणि पीटर्सने 82.89 मीटर फेक केली.वडलेचचा पाचवा प्रयत्न फाऊल ठरला. तर, नीरजने 82.28 मीटर आणि पीटर्सने 85.08 मीटर फेक केली. अशा परिस्थितीत वडलेच पहिल्या, नीरज दुसऱ्या आणि पीटर्स तिसऱ्या क्रमांकावर राहिला.