नदाल अंतिम फेरीत

मंगळवार, 16 मे 2017 (11:59 IST)
क्लेकोर्टवर येथे सुरू असलेल्या माद्रीद मास्टर्स पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत स्पेनच्या राफेल नदालने सर्बियाच्या द्वितीय मानांकित जोकोव्हिकला पराभवाचा धक्का देत एकेरीची अंतिम फेरी गाठली. उपांत्य फेरीच्या सामन्यात नादालने जोकोव्हिकवर 6-2, 6-4 अशा सरळ सेटमध्ये मात केली. नादालने जोकोव्हिक विरुद्ध गेल्या सहा सामन्यात पराभव कत्करला होता. या विजयामुळे नदालने आपल्या पराभवाची मालिका खंडित केली आहे. ऑस्ट्रीयाचा थिम आणि उरुग्वेचा क्युव्हेस यांच्यात होणार्‍या उपांत्य फेरतील विजयी खेळाडू विरुद्ध नदालचा जेतेपदासाठी अंतिम सामना राहील. 2014च्ये पेंच ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीतील पराभवानंतर नदाल जोकोव्हिक विरुद्ध एकही सामना जिंकला नव्हता. 

वेबदुनिया वर वाचा