अनुभवी भारतीय बचावपटू अनस एडथोडिका याने 17 वर्षांची दीर्घ कारकीर्द संपवून व्यावसायिक फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. 37 वर्षीय खेळाडूने 21 वेळा भारताचे प्रतिनिधित्व केले. याशिवाय त्याने क्लबसाठी 172 स्पर्धात्मक सामनेही खेळले आहेत. एडथोडिकाने शनिवारी आपल्या सोशल मीडिया हँडलवर एक भावनिक व्हिडिओ शेअर केला आणि निवृत्तीची घोषणा केली.
त्याने एक भावनिक व्हिडीओ शेअर केला आहे. आता माझ्या व्यावसायिक फुटबॉलला अलविदा करण्याची वेळ आली आहे. मलप्पुरमच्या स्टेडियमपासून भारताच्या स्टेडियमपर्यंतचा हा प्रवास स्वप्नवत होता. या चढ-उतारांदरम्यान, जेव्हा मला गरज होती तेव्हा मला पाठिंबा दिल्याबद्दल माझे कुटुंब, प्रशिक्षक, सहकारी आणि चाहत्यांचे आभार. फुटबॉलने मला खूप काही दिले आहे. प्रत्येक क्षणासाठी मी नेहमीच ऋणी राहीन.
अनसने 2015 मध्ये दिल्ली डायनॅमोजमधून इंडियन सुपर लीग (ISL) मध्ये पदार्पण केले. नंतर तो जमशेदपूर एफसी, केरळ ब्लास्टर्स एफसी आणि एटीके एफसीकडून खेळला. अनसची 2017-18 ISL प्लेयर्स ड्राफ्टच्या पहिल्या फेरीत जमशेदपूरने निवड केली होती. त्याने 2015-2022 पर्यंत 54 सामने खेळले आणि चमकदार कामगिरी केली.