जगातील सर्वात वेगवान धावपटू असलेला जमैकाचा उसैन बोल्ट सध्या मस्तीच्या मूडमध्ये असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच झालेल्या एका होळीच्या पार्टीमुळे तो चर्चेत आला आहे. या होळीच्या पार्टीसाठी त्याने कोणते हॉटेल बुक केले नव्हते, तर त्याने आपल्या खासगी जागेतच ही पार्टी केली. याप्रसंगी बोल्ट काही सुंदर तरुणींसोबत रंगात रंगलेला दिसून येतो. याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. उसैन बोल्टची त्रिनिदाद कार्निव्हलच्या पार्टीचे काही फोटोज सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले आहेत.