Hockey : चार देशांच्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारतीय पुरुष हॉकी संघ स्पेनला रवाना

शुक्रवार, 21 जुलै 2023 (07:22 IST)
कर्णधार हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय पुरुष हॉकी संघ बुधवारी चार देशांच्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पेनला रवाना झाला. स्पॅनिश हॉकी फेडरेशनच्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण करण्यासाठी 25 ते 30 जुलै दरम्यान टेरासा येथे चार देशांची ही स्पर्धा खेळवली जाईल. या स्पर्धेत यजमान स्पेन आणि भारताव्यतिरिक्त इंग्लंड आणि नेदरलँडचे संघही सहभागी होणार आहेत.
 
भारतीय संघ 25 जुलैला स्पेनविरुद्धच्या मोहिमेला सुरुवात करेल आणि त्यानंतर 26 जुलैला नेदरलँड्सविरुद्ध खेळेल. भारताचा राऊंड रॉबिन टप्प्यातील अंतिम सामना २८ जुलै रोजी इंग्लंडशी होणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना 30 जुलै रोजी होणार आहे. आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी आणि त्यानंतर होणार्‍या आशियाई खेळांच्या तयारीच्या दृष्टीने ही स्पर्धा भारतासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
 





Edited by - Priya Dixit 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती