हॉकी इंडियाकडून राष्ट्रीय शिबिरासाठी खेळाडूंची घोषणा

गुरूवार, 14 मार्च 2024 (10:03 IST)
भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवर 12 ते 30 मार्च दरम्यान होणाऱ्या वरिष्ठ पुरुषांच्या राष्ट्रीय शिबिरासाठी हॉकी इंडियाने 28 संभाव्य खेळाडूंची घोषणा केली आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या तयारीला बळ देण्यासाठी हे शिबिर अत्यंत महत्त्वाचे आहे.
भारत सध्या लीगमध्ये आठ सामन्यांतून 15 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. 22 मे रोजी बेल्जियममधील अँटवर्प येथे लीग पुन्हा सुरू होईल. यानंतर शेवटचा टप्पा १ जूनपासून लंडन आणि त्यानंतर नेदरलँडमध्ये खेळवला जाईल. संभाव्य खेळाडूंमध्ये गोलरक्षक कृष्ण बहादूर पाठक, पीआर श्रीजेश आणि सूरज करकेरा, बचावपटू हरमनप्रीत सिंग, जर्मनप्रीत सिंग, अमित रोहिदास, जुगराज सिंग, संजय, सुमित आणि आमिर अली यांचा समावेश आहे. मिडफिल्डर्समध्ये मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, विवेक सागर प्रसाद, आरएस मोइरंगथम, शमशेर सिंग, नीलकांत शर्मा, राजकुमार पाल आणि विष्णुकांत सिंग यांचा समावेश असेल.
फॉरवर्ड खेळाडूंमध्ये आकाशदीप सिंग, मनदीप सिंग, ललित कुमार उपाध्याय, अभिषेक, दिलप्रीत सिंग, सुखजित सिंग, गुरजंत सिंग, मोहम्मद राहील मौसीन, बॉबी सिंग धामी आणि अरिजित सिंग हुंदल यांची निवड करण्यात आली आहे. मुख्य प्रशिक्षक क्रेग फुल्टन म्हणाले, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी आम्हाला सर्वोत्तम फॉर्म साधायचा आहे. या शिबिरात निवड झालेल्या खेळाडूंना आगामी महत्त्वाच्या सामन्यांमध्ये संधी मिळणार आहे. आम्ही अनुभवी आणि युवा खेळाडूंची निवड केली आहे.
 
Edited By- Priya Dixit  
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती