सात्विकचा स्मॅश एखाद्या फॉर्मुला वन कार च्या 372.6 किमी प्रति तास च्या वेगाहून देखील अधिक वेगवान होता महिला विभागात सर्वात वेगवान बॅडमिंटन 'हिट' करण्याचा विक्रम मलेशियाच्या टॅन पर्लीच्या नावावर आहे, ज्याने 438 किमी प्रतितास वेगाने शॉट मारला.
जपानची खेळ उपकरण निर्माती कंपनी योनेक्स म्हणाली , योनेक्सला जाहीर करताना अभिमान वाटतो की योनेक्स बॅडमिंटनपटू सात्विकसाईराज रँकीरेड्डी (भारत) आणि टेन पर्ली (मलेशिया) यांनी अनुक्रमे पुरुष आणि महिला बॅडमिंटनमध्ये सर्वात वेगवान हिटसाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तयार केला आहे. 14 एप्रिल 2023 रोजी जागतिक विक्रम स्थापित करण्यात आला आणि त्या दिवसाच्या गती मापन परिणामांवर आधारित गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकृत न्यायाधीशांनी पुष्टी केली