ऊली स्टेक हे स्वित्झर्लंड या देशाचे होते. त्यांची २०१७ वषार्तील महत्वाकांक्षी मोहीम म्हणजेच जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट (८८५० मीटर्स) आणि जगातील चौथे उंच शिखर माऊंट लोहत्से (८५१६ मीटर्स) या दोनही शिखरांवर नव्या मार्गाने चढाई करण्याची मोहीम पूर्ण करण्यासाठी नेपाळमध्ये आले होते. या मोहिमेच्या तयारीसाठी ते गेले २ महिने माऊंट एव्हरेस्टच्या परिसरातील वेगवेगळ्या शिखरांवर चढाई करत होते. या तयारीचा भाग म्हणून आणि वातावरणाशी समरस होण्यासाठी ३० एप्रिल रोजी सकाळी नूपतसे या शिखरावर त्यांनी चढाईला सुरुवात केली. चढाई करताना त्यांचा पाय घसरून साधारण ३००० फूट खोल नूपतसे शिखराच्या तळाशी पडून त्यांचा मृत्यू झाला.