पहिल्या सामन्यात उझबेकिस्तानचा 16.0 ने पराभव झाला होता. भारतीय संघाकडून हरमनप्रीतने चार (24व्या, 39व्या, 40व्या, 42व्या मिनिटाला), मनदीपने तीन (12व्या, 30व्या आणि 51व्या मिनिटाला), वरुण कुमारने दोन (55व्या मिनिटाला), अभिषेकने दोन (51व्या आणि 52व्या मिनिटाला) गोल केले.
सिंगापूरसाठी एकमेव गोल मोहम्मद झकी बिन जुल्करनैनने केला. जागतिक क्रमवारीत सिंगापूर 49व्या स्थानावर असल्यामुळे टोकियो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारतासाठी हा पुन्हा एकदा न जुळणारा सामना होता. भारताला आता 28 सप्टेंबर रोजी पूल ए च्या पुढील साखळी सामन्यात जपानशी खेळायचे आहे.