21-18 असा विजय साजरा केला. त्यानंतर इंडोनेशियन ओपनचा उपविजेता जपानच्या काझुमासा साकाईवर 21-5 आणि 21-16 अशी दणदणीत मात केली. इंडोशियन ओपनचे अजिंक्यपद पटकावणार्या के. श्रीकांतसमोर पहिल्या फेरीत चायनिज तैपेईच्या कान युचे आव्हान असेल. एच.एच. प्रणॉलाही मुख्य स्पर्धेत थेट प्रवेश मिळाला असून इंग्लंडच्या राजीव ओस्पेविरुद्ध त्याची पहिली लढत होईल. महिला एकेरीत ऋत्तिका गड्डेने ऑस्ट्रेलियाच्या सेलविनावर 21-15, 21-15 तर रुविंदीवर 21-9, 21-7 असे नमवून मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरली. भारताची आणखी एक खेळाडू शिवानीची लढत चीनच्या चांगविरुद्ध होईल. सायना नेहवाल, पी.व्ही. सिंधू आणि साई प्रणिथ यांच्या पहिल्या लढतीत बुधवारी रंगणार आहेत.