‘क्ले किंग’ नदालचे आठवे विजेतेपद

PR
स्पेनचा टेनिसपटू राङ्खेल नदाल याने त्याच्याच देशाच्या डेव्हिड फेरर याचा तीन सेटमज्ञध्ये सरळ पराभव करून फ्रेंच खुल्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकाविले.

रविवारी खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यामध्ये नदालने फेररचा 6-3, 6-2, 6-3 असा तीन सेटमध्ये सरळ व सहज पराभव केला. या विजयासह त्याने विक्रमी अशा आठववेळी ही स्पर्धा जिंकली आहे. हा अंतिम सामना दोन तासाच्यावर खेळला गेला. हा अंतिम सामना वाटला नाही. ही लढत एकतर्फीच ठरली.

नदालने पहिला सेट 40 मिनिटांत, दुसरा सेट 54 मिनिटांत तर तिसरा सेट 40 मिनिटात जिंकला. त्याने मॅच पॉईंट घेताना फटका मारला, त्यावेळी फेरर तो फटका घेऊ शकला नाही. त्याक्षणी नदालने आपली रॅकेट जमिनीवर टाकली व आपला विजय साजरा केला.

नदाल क्ले कोर्टचा राजा आहे व त्याने राजाप्रमाणेच खेळ केला. नदाल व फेरर हे स्पेनचे एकमेकांचे सहकारी खेळाडू आहेत. या दोघांमध्ये आजपर्यंत 27 सामने खेळले गेले. त्यापैकी 23 वेळा नदालने बाजी मारली तर 4 वेळा फेररने विजय मिळविला. या स्पर्धेमध्ये फेररने एकही सेट गमावलेला नाही.

वेबदुनिया वर वाचा