सायनाची विजयी सुरुवात!

वेबदुनिया

शुक्रवार, 16 मार्च 2012 (11:37 IST)
WD
सायना नेहवालने स्विस ओपन ग्रां. प्री. गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. स्वित्झर्लंड येथील बॅसेल येथे ही स्पर्धा सुरू असलेल्या या स्पर्धेत सायनाने जपानच्या सायका सातोला 21-13, 21-8 असे पराभूत केले आहे.

सायनाने सायकाला अवघ्या 33 मिनिटांत नमवले. जागतिक रॅकिंगमध्ये पंधराव्या क्रमांकावरील सायकाने या आधी फक्त एकदा सानयावर सरशी साधली होती मात्र यावेळी अनुभवी सायना समोर तिचा निभाव लागला नाही. सायनाने आक्रमक खेळ केला.

वेबदुनिया वर वाचा