सानिया पहिल्याच फेरीत पराभूत

वेबदुनिया

गुरूवार, 1 मार्च 2012 (16:12 IST)
WD
भारताची आघाडीची महिला टेनिसपटू सानिया मिर्झा हिला मलेशियन ओपन टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला. तिला एलिनी डानिलिडोऊ हीने 6 -2, 1-6, 6-4 असे पराभूत केले.

पहिला सेट गमावल्यानंतरही सानियाने दुसरा सेट जिंकून सामना बरोबरीत आणला होता. मात्र तिला तिसर्‍या सेटमध्ये हीच लय कायम राखता आली नाही. त्यामुळे तिला पराभव पत्कारावा लागला.

वेबदुनिया वर वाचा