सानियाचे स्वप्न

बुधवार, 4 नोव्हेंबर 2015 (09:52 IST)
नवी दिल्ली- पुढील वर्षी होणार्‍या रिओ ऑलिंपिकमध्ये पदक जिंकणे हे माझे मोठे स्वप्न असल्याचे भारताची टेनिसपटू सानिया मिर्झाने म्हटले आहे. तथापि जर मला हे पदक मिळविता आले नाही तरीही हरकत नाही. कारण त्यामुळे सर्व थांबणार नाही, तर आपण अधिक जोमाने प्रयत्न करू, असेही ती म्हणाली.
 
लियांडर पेससोबत मिश्र दुहेरीचे पदक मिळण्याची मला आशा आहे, असेही सानिया म्हणाली. सानियाने मार्टीना हिंगिससोबत गेल्या वर्षभरात आठ विजेतेपद पटकावली आहेत.

वेबदुनिया वर वाचा