सानियाची दुहेरी, मिश्र दुहेरीत आगेकूच

वेबदुनिया

मंगळवार, 24 जानेवारी 2012 (12:16 IST)
ND
भारताची अव्वल टेनिसपटू सानिया मिर्झा हीने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये आपली दुहेरी वाटचाल सुरू ठेवली. तिने महिलांच्या दुहेरीत आणि मिश्र दुहेरीत सोमवारी उपांत्यपूर्व फेरी गाठली.

सानियाने महेश भूपतीसह मिश्रदुहेरीत झेक प्रजासत्ताकची इव्हेटा बेनसेव्हा आणि ऑस्ट्रियाचा जुर्गन मेलझर या जोडीचा पिछाडीहून येत 3-6, 6-4, 12-10 अशा अटीतटीच्या सामन्यात पराभव केला. तर महिलांच्या दुहेरीत सानियाने आपली रशियन सहकारी एलेना वेस्निना हिच्यासह ऑस्ट्रेलियाच्या जर्मिला गॅजडोसोव्हा आणि अमेरिकेच्या बेथेनी मॅटेक सॅण्ड या जोडीवर 7-5, 6-3 असा सरळ सेटमध्ये विजय मिळवला.

रोहन बोपन्ना - लिसा रेमंड विजयी
मिश्रदुहे‍रीच्या आणखी एका लढतीत भारताच्या रोहन बोपन्ना आणि अमेरिकेची लिसा रेमंड या जीडीने कॅसी डेलेक्वा आणि मॅथ्यू एबडन जोडीवर 6-4, 6-2 असा विजय मिळवला.

वेबदुनिया वर वाचा