रिओ ऑलिम्पिकमधील 58 किलो वजनी गटाच्या कुस्ती स्पर्धेत साक्षी मलिकने किर्गिस्तानच्या एसुलू ताइनीबेकोवा हिला 8-5 गुणांनी चीतपट करून कांस्यपदकाची कमाई केली होती. साक्षीने आपल्या कारकीर्दीतील हे तिसरे पदक जिंकले आहे. साक्षी मलिक कांस्य पदक घेऊन मायदेशी परतली. पहाटे 4च्या सुमारास दिल्ली विमानतळावर तिचे आगमन होताच मोठा जल्लोष करण्यात आला.