शूमाकर सचिनला भेटण्यास उत्सुक

वेबदुनिया

शनिवार, 29 ऑक्टोबर 2011 (14:08 IST)
ND
फॉर्म्युला वन कार रेसिंगचा पाचवेळचा जगज्जेता जर्मन चालक मायकल शूमाकर भारतातील स्पर्धेच्या निमित्ताने ‍सचिन तेंडुलकरला भेटण्यास उत्सुक आहे. आपला मित्र सचिनसोबत छान गप्पा मारण्याची इच्छा असल्याचे शूमाकरने सांगितले. सचिनला फेरारी भेट देणार्‍या या कार रेसिंगच्या बादशाहने सांगितले की, माझी आणि सचिनची शेवटची भेट नेमकी कधी झाली तेच आठवत नाही. त्याल आता बराच काळ लोटला आहे. आता भारतात येण्याची संधी मिळाल्याने ‍सचिनला भेटण्याच ठरवले आहे, असे तो म्हणाला.

आपल्या कारकीर्दीच्या दुसर्‍या टप्पयात अद्याप यश न मिळालेल्या शूमाकरने पुन्हा विजेतेपदाचा आनंद लुटण्याची इच्छा असल्याचे सांगितले.

वेबदुनिया वर वाचा